SVN Amravati

पालकांना सूचना

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे. तर्फे (निवळलेल्या विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा) घेतल्या गेलेल्या शष्यवृत्ती स्पर्धा परिक्षा मेरिट नुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो.

(१६) कपडे व. गणवेश- 

(१) प्रत्येक मुलाने शाळेच्या नियमानुसार व्यक्तिगत कपडे आणावयाचे आहेत. विद्यार्थ्याने गरजेपेक्षा अधिक कपडे न आणता शाळेने दिलेल्या यादी प्रमाणेच कपडे आणावेत.

(२) शाळेतील विद्यार्थ्यांकरिता ठराविक स्वरूपाचा गणवेश निर्धारित करण्यात येईल. (समग्र शिक्षा अभियना अंतर्गत शासनाच्या नियमानुसार वर्ग ६ ते 8 च्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येईल, व माजी विद्यार्थी संघटना व शाळा व्यवस्थापन समिती यांनी केलेल्या आर्थिक मदती नुसार इतर विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात येतात).

(१७) शालेय सत्र व सुट्या- शाळेची दोन सत्रे राहतील, पहिले सत्र जून ते दिवाळी- पर्यंत राहील व दुसरे सत्र दिवाळीनंतर सुरू होऊन एप्रिलच्या मध्यापर्यंत राहील. दीर्घ मुदतीच्या सुट्टया दोनदा दिल्या जातील (उन्हाळी सुट्टी/दिवाळीची सुट्टी).

(18) शाळेचा दैनंदिन कार्यक्रम नियामक मंडळाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे आधीन राहून स्थानिक परिस्थितीनुसार प्राचार्य ठरवतील.

(19) शिस्त- विद्यानिकेतनासाठी ठरवून दिलेले शिस्तविषयक नियम कर्मचारी व विद्यार्थी या दोघांवरही बंधनकारक राहतील. विद्याथ्यांचे विद्यानिकेतनामधील त्याचप्रमाणे विद्यानिकेतना बाहेरील सामाजिक जीवनामधील वर्तन त्यांनी विद्यानिकेतनामध्ये जोपासलेल्या जीवनमूल्यानुसार असावे. विद्यानिकेतनाच्या प्रतिष्ठेला तडा जाईल असे वर्तन त्यांच्याकडून होऊ नये. पालकांनीही याबद्दल जागरूक राहून विद्याथ्यांच्या कौटुंबिक व सामाजिक जीवनामधे चारिल्यसंवर्धनास व गुणविकासास पोषक असे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न करावेत.

(२०) प्रवासाची व्यवस्था- सुट्टीमध्ये घरी जाणे आणि सुट्टी संपल्यानंतर शाळेत परत येणे, शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी उपस्थित रहाणे, इत्यादीबाबत आई- वडिलांना स्वतंत्र सूचना देण्यांत येतात. एकदा मुले शाळेत दाखल झाल्यानंतर सुट्टीचे काळात शाळतून घरी जाणे व घरून शाळेत परत येणे याबाबतच्या मार्गदर्शक सूचना प्राचार्य पालकांना देतात व पालकांनी त्या पाळाव्यात असे ने-आन करणे अपेक्षित आहे.

आईवडील/पालकांना मार्गदर्शक सूचना

 पाच वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याशिवाय विद्यार्थ्यां मधुन शिक्षण अर्धवट सोडून विद्यानिकेतनामधून जाता येणार नाही.

२ काही अपरिहार्य कारणास्तव विद्यार्थ्याला विद्यानिकेतनामधून मधेच नाव काढणे आवश्यक झाल्यास शासनाने त्याच्यावर केलेला खर्च अधिक १० टक्के दंड भरल्यावरच त्याला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र मिळनार (टी सी). त्याकरिता प्रवेश कमी करण्यासाठी अर्ज देणे अपरिहार्य आहे त्यानंतर सदर प्रस्ताव मा.शिक्षण संचालनालय पुणे यांच्या कडे पाठविण्यात येईल प्रक्रियेला काही कालावधी लागू शकतो तसेच प्रवेष कमी केल्यावर त्याला इतर शाळेत प्रवेश देणे आवश्यक राहील. 

३ विद्यार्थी परीक्षेस बसल्यानंतर शाळा सोडण्यापूर्वी संपूर्ण फीची व हातखर्चाची थकबाकी तसेच इतर काही येणे असणारी रक्कम भरल्याशिवाय त्याला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र मिळणार नाही.

४ विद्यानिकेतनातील एखाद्या विद्यार्थ्यांची वर्तणूक असभ्य, आक्षेपार्ह अथवा अनैतिक स्वरूपाची आढळल्यास कोणत्याही वेळी अशा विद्याथ्यर्थाचे विद्यानिकेतनामधून नाव काढून त्याला पालकांच्या स्वाधीन केले जाईल.

५ विद्यानिकेतनाच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात ज्या तारखेस होते त्या तारखेस सर्व नियमांची पूर्तता करूनच विद्यार्थ्याला विद्यानिकेतनात प्रवेश घेता येईल.

६ आपल्या पाल्याची प्रगती घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेले सर्व सहकार्य पालकांकडून  विद्यानिकेतनाला मिळावे अशी अपेक्षा आहे.

  विद्यानिकेतनात असताना विद्यार्थ्यांने शाळेच्या गणवेशातच शाळेत अथया शाळेच्या बाहेर वावरावे अशी अपेक्षा आहे. कोणत्याही सबाबीवर विद्यार्थ्याला परवानगी शिवाय आपला खाजगी पोषाखात  विद्यानिकेतनात असेपर्यंत वावरता येणार नाही.

8 आपल्या पाल्याची फी पालकांनी वेळच्या वेळी भरावी, तसेच हातबर्चासाठी लागणारी रक्कम भरण्यातही दिरंगाई करू नये. वेळोवेळी कार्यालयाशी संपर्क साधून फी बाबत माहिती ची देवाण घेवाण करणे.

9. विद्यार्थ्यांचा अभ्यास, वर्तणूक, इत्यादी बाबतीत संस्थेकडून होणाऱ्या पत्रव्यवहाराची व संदेशाची/फोनची पालकांनी गंभीरपणे नोंद घेऊन त्यांना योग्य पतिसाद यावा अशी अपेक्षा आहे.

१० *पालकांनी वर्षातील काही वेळ तरी आपल्या पाल्याची शाळेतील प्रगती व विविध कार्यक्रमांतील त्याचा सह‌भाग याची प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी राखून ठेवावा यामुळे विद्यानिकेतनामधून प्रतिवर्षी माध्यमिक शालांत परीक्षेला बसणान्या ४० विद्यार्थ्यांपैकी ६० टक्केच्यावर गुण मिळवणाऱ्या पहिल्या २० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल. प्रत्येक विद्यानिकेतनामध्ये या शिष्यवृत्तीचे संच आहेत संबंधित विद्यार्थ्यांना माध्यमिक शालांत परीक्षा निकालानंतर अनुज्ञेयता दाखला दिला जाईल तो ज्या महाविद्यालयात प्रवेश घेईल तेथे प्रवेश घेतल्याचा अहवाल त्याने पाठविल्यानंतर इयत्ता ११ वी व १२ विमध्ये त्याला रुपये १,००० शिष्यवृत्ती मिळेल याशिवाय शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेतल्यास शैक्षणिक शुल्क माफ करण्यात येईल व वसतिगृहातही प्रवेश मिळू शकेल अशा विद्यार्थीला तेथे वसतिगृह शुल्क द्यावे लागणार नाही इयत्ता १२ बीनंतर ही शिष्यवृत्ती १,५०० रुपये दराने दिली जाईल शिष्यवृत्ती सहा वर्षाचा कोणत्याही शाखेचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत चालू राहील त्यासाठी विद्यार्थी प्रतिवर्षी किमान ५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होण् आवश्यक आहे.*

(* शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या नियमानुसार व उपलब्ध आर्थिक तरतुदी नुसार निर्णय शासन स्तरावर घेतले जातात)

आईवडिलांस/पालकांस उद्देशून :-

१. प्रत्येक महिन्याच्या फक्त दुस-या रविवारी मुलाला पुर्व परवानगीने भेटता येईल. 
२. संस्थेने जाहिर केलेल्या सुटीशिवाय विद्यार्थ्यांना कोणतीच सुटी मिळणार नाही.
३. मुलाकडून नियमाचा भंग झाल्यास पालकांना लेखी कळविल्या जाईल त्यावेळी प्रत्यक्ष येऊन सक्षम अधिका-यांजवळ चौकश करावी.
४. मुलांचे नावे केव्हाही रक्कम पाठवु नये.
५. दर तीन महिन्यांनी पालकांने प्राचार्याशी पत्राव्दारे भेट घेऊन मागच्या प्रगतीचा भरलेला व बाकी असलेल्या फी चा तरकड खर्चाचा हिशोबाचा अहवालाबाबत चर्चा करावी.
६. संस्थेला दोन मोठ्या सुटया असतात त्यावेळी पालकांना पत्राने कळविले जाते त्याची त्वरित दखल घेऊन प्राचार्याना पत्र पाठवावे.
७. लहान मुलांच्या विभिन्न तक्रारी असतात याची सातत्याने सक्षम अधिकारी दखल घेत असतात. अजाणता काही विद्यार्थी आपल्या तक्रारी पालकांना कळवितात. त्यावेळी पालकांनी मा. प्राचार्याशी संपर्क साधुन तक्रारीचे निवारण करावे.
८. परस्पर सामजंस्य, स्नेहभाव, कुशल नेतृत्व, करारे व्यक्तीमत्व, सहकार्याची आवड, शिस्तबध्द जीवन जगण्याची कला परिश्रम करण्याची वृत्ती, बरे वाईट कळण्याची क्षमता वस्तीगृह हे समाजाचे लहान स्वरूप असताना आपली न्यायप्रिय वागणूक या सारख्या गुणंची जोपासना करण्याची कंकण संस्था चालकांनी बांधले आहे. याबाबत पालकांचा सहकार्याचा हात मिळावा ही अपेक्षा.
९. फी पडत असल्यास तिचा भरणा वेळोवेळी दयावा.
१०. फी साठी सर्व उत्पन्नाचा विचार केला जातो.
११. पालकांने सदर पत्र मिळाल्यापासून ८-१० दिवसाचे आत प्रथम चर्चा करिता पाल्यास सोबत घेऊन यावे. विलंब केल्यास सुचितील पुढील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाईल, यांची गंभिरतेने नोंद घ्यावी.

वरिल सर्व नियमांचा / भर्तीचा / भरावयाच्या फी चा आरंभी भरावयाच्या रक्कमेचा विचार केल्यावर आपला पाल्य निकेतनमध्ये पाठवायचे नक्की केल्यास सोबतचे मान्यता पत्र त्वरित भरून दिलेल्या दिनांक —पर्यंत या संसथेत पोहचेल असे पाठवावे. शक्य झाल्यास आपला होकार / नकार लेखी स्वरूपात संदेशाच्या मार्फत कळवावा.
सर्व कागदपत्र भरावयाची सर्व रक्कम घेऊन मुलाला दिलेल्या दिनांकपर्यंत प्रवेश घेण्यास आणावे. प्रवेश घेण्याची अंतिम तारखेपर्यत आपल्याकडुन काहीच न कळल्यास आपला नकार गृहीत धरून यादीतील पुढच्या मुलांना प्रवेश घेण्याची संधी प्राप्त करून दिल्या जाईल याची जाणीव ठेवावी.

(ब) एखाद्या विद्यार्थ्यास वाईट वर्तणूक अथवा असमाधानकारक प्रगती व काही अपरिहार्य कार्या मुळे या कारणासाठी शाळे- मधून काढण्यात आल्यास, त्याच्या आईवडिलांना/पालकांना त्याने पूर्ण केलेल्या संपूर्ण अभ्यास- क्रमाच्या कालावधीची फी शाळेस परत करावी लागेल किवा नियामक मंडळ ठरवील तेवढी रक्कम शासनाकडे भरावी लागेल. तसेच शासनाने विद्यार्थ्यांवर केलेला एकूप खर्च अधिक १० टक्के दंड भरावा लागेल आणि शाळेचा दाखल देण्याकरिता मा. संचालक पुणे यांची परवानगी आल्यावरच दाखला (TC) देण्यात येईल. यासाठी काही कालावधी लागू शकते.

Scroll to Top