









शासकीय विद्यानिकेतन, एक परिचय
हेतू व उद्देश महाराष्ट्र राज्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा विस्तार गेल्या वर्षात सर्वत्र मोठ्या प्रमाणात झाला असल्यामुळे कानाकोपऱ्यातील खेड्यापाड्यात शिक्षणाच्या सोई सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून राज्यातील सर्व मुलांना शैक्षणिक प्रगतीच्या किमान संधी प्राप्त झाल्या आहेत असे असले तरी देखील ग्रामीण भागातील प्रतिकूल शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमुळे तेथील बुद्धीमान मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या मार्गात अजूनही अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे दिसून येते. त्यामधून मार्ग काढून ग्रामीण भागातील गुणवान मुलांचा शारीरिक, बौद्धिक व मानसिक विकास होण्यासाठी योग्य ते अध्ययन-अध्यापन वातावरण त्यांना उपलब्ध व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाने चार विद्यानिकेतने राज्यात 1966 साली सुरू केली. यांपैकी शासकीय विद्यानिकेतन, चिखलदरा ची स्थापना सन १९६७ ला करण्यात आली नंतर हेच विद्यानिकेतन सन १९७९ ला अमरावती येथे स्थानांतर करण्यात आले प्रत्येक विद्यानिकेतनात सर्वसाधारण विद्यार्थ्यांव्यतिरिक्त महाराष्ट्राच्या आदिवासी विभागातील आदिवासी विद्याथ्यांना प्रवेश दिले जातात, प्रतिवर्षी 17 नवीन आदिवासी विद्यार्थी इयत्ता ५ वी मध्ये अवेश घेत असल्यामुळे चारही विद्यानिकेतनांत प्रत्येक वर्गात किमान 17 आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधा दिल्या गेल्या आहेत केवळ आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ५ वे स्वतंत्र विद्यानिकेतन केळापूर, जिल्हा यवतमाळ, सन 1981 मध्ये सुरू करण्यात आले.


शासकीय विद्यानिकेतन शाळेतील सुविधा
- सभागृह
- संगणक लॅब
- डिजिटल क्लासरूम
- शालेय प्रयोग शाळा
- वाचनालय
- खेळाचे मैदान
- नावीन्य पूर्ण प्रयोग शाळा

शासकीय विद्यानिकेतन वसतिगृह सुविधा
- वाचनालय
- विद्यार्थी निवास कक्ष
- सुजल भोजनकक्ष
- CCTV युक्त परिसर
- २४ तास सुरक्षा रक्षक
- सोलर हॉट वॉटर
- वॉटर फिल्टर कुलरसह