
श्री. सुनीलजी भुतडा
अध्यक्ष, शासकीय विद्यानिकेतन शाळा व्यवस्थापन समिती अमरावती
शासकीय विद्यानिकेतन, एक परिचय

हेतू व उद्देश महाराष्ट्र राज्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा विस्तार गेल्या वर्षात सर्वत्र मोठ्या प्रमाणात झाला असल्यामुळे कानाकोपऱ्यातील खेड्यापाड्यात शिक्षणाच्या सोई सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून राज्यातील सर्व मुलांना शैक्षणिक प्रगतीच्या किमान संधी प्राप्त झाल्या आहेत असे असले तरी देखील ग्रामीण भागातील प्रतिकूल शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमुळे तेथील बुद्धीमान मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या मार्गात अजूनही अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे दिसून येते. त्यामधून मार्ग काढून ग्रामीण भागातील गुणवान मुलांचा शारीरिक, बौद्धिक व मानसिक विकास होण्यासाठी योग्य ते अध्ययन-अध्यापन वातावरण त्यांना उपलब्ध व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाने चार विद्यानिकेतने राज्यात 1966 साली सुरू केली. यांपैकी शासकीय विद्यानिकेतन, चिखलदरा ची स्थापना सन १९६७ ला करण्यात आली नंतर हेच विद्यानिकेतन सन १९७९ ला अमरावती येथे स्थानांतर करण्यात आले प्रत्येक विद्यानिकेतनात सर्वसाधारण विद्यार्थ्यांव्यतिरिक्त महाराष्ट्राच्या आदिवासी विभागातील आदिवासी विद्याथ्यांना प्रवेश दिले जातात, प्रतिवर्षी 17 नवीन आदिवासी विद्यार्थी इयत्ता ५ वी मध्ये अवेश घेत असल्यामुळे चारही विद्यानिकेतनांत प्रत्येक वर्गात किमान 17 आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधा दिल्या गेल्या आहेत केवळ आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ५ वे स्वतंत्र विद्यानिकेतन केळापूर, जिल्हा यवतमाळ, सन 1981 मध्ये सुरू करण्यात आले.केळापूर विद्यानिकेतनात 6 वी ते 10 या वर्गाच्या प्रत्येकी दोन तुकड्या असून प्रतिवर्षी 10 वी च्या प्रत्यक तुकडीत 40 आदिवासी विद्याथ्यांना प्रवेश दिले जातात.
विद्यार्थ्यांच्या अंगी शैक्षणिक व शारीरिक शिस्त बाणावी, त्यांना सहजीवनाची सवय लागावी, त्यांच्या ठिकाणी सहकार्याने काम करनाची वृत्ती निर्माण व्हावी, अंगीकृत सामाजिक कर्तव्यात व सेवेत निष्ठापूर्वक परिश्रम करण्याची वृत्ती त्यांच्यात वृद्धींगत व्हावी व निर्भयता वाढावी म्हणून या विद्यानिकेतनामध्ये वसतिगृहात्मक शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. “उद्धरावा स्वयें आत्मा” है या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. या शाळांमधून जे विविध उपक्रम हाती घेतले जातात, त्यामधून ग्रामीण मुलांच्या सर्वांगीण उन्नतीचा मार्ग खुला होऊन त्यांचे व्यक्तिमत्व विकसित होऊ शकते व त्यांच्या अंगी नेतृत्वाचे गुण निर्माण होण्यास मदत होते.
प्राचार्य श्री. नरेंद्र गायकवाड (अमरावती) -९४२१७८८६२९
तथा सचिव, शासकीय विद्या निकेतन शाळा व्यवस्थापन समिती, अमरावती.
(२) विद्यानिकेतन नियामक मंडळ:- शासकीय व आदिवासी विद्यानिकेतनांची कार्यपद्धती व्यवस्थापन यासाठी एक राज्यस्तरीय नियामक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे.
मा. राज्यमंत्री (शिक्षण) हे या नियामक मंडळाचे अध्यक्ष असून मा. शिक्षण सचिव उपाध्यक्ष आहेत. (शा.म.मु.) एनए 1639-1 (500-11-90)
शिक्षण संचालका, उच्च शिक्षण, उप सचिव, शिक्षण विभाग, उप सचिव, आदिवासी कल्याण विभाग, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, आयुक्त, शासकीय परीक्षा मंडळ, उप सचिव वित्त विभाग, शिक्षण सहसंचालक (शालेय शिक्षण), सर्व विभागीय शिक्षण उप संचालक आणि प्राचार्य, शासकीय विद्यानिकेतन हे या नियामक मंडळाचे सदस्य आहेत. नियामस मंडळाच्या वर्षामधून किमान दोन बैठका घेण्यात येतात.
(३) प्रत्येक विद्यानिकेतनात इयत्ता ६ ती ते १० वी चे ५ वर्ग असून प्रत्येक वर्गात २३ सर्वसाधारण संवर्गातील अधिक १७ आदिवासी असे एकूण ४० विद्यार्थी आहेत. या शाळांचे शिक्षणाचे माध्यम मराठी (सेमी इंग्रजी)आहे.
प्रथम श्रेणीतील सरकारी अधिकारी विद्यानिकेतनाच्या प्राचार्यपदी काम करतात. त्यांच्या मदतीला उप प्राचार्य (कुलप्रमुख) व गृहप्रमुख (वसतिगृह व्यवस्थापक) असे द्वितीय श्रेणीतील दोन अधिकारी असतात. विद्यानिकेतनासाठी एकूण १२+१ शिक्षकांची पदे अनुज्ञेय असून पदावर नियुक्त केले जाणारे शिक्षक एम.ए./एम.एस.सी./बी.ए./बी.एससी. ही शैक्षणिक अर्हता व बी.एड. एम.एड./बी.पी.एड. एम.पी.एड. ही व्यवसायिक अर्हता धारण करणारे असतात. त्याशिवाय हस्तव्यवसाय व संगीत या विषयांसाठी स्वतंत्र अर्धवेळ शिक्षकांची पदे मंजूर आहेत. एन.सी.सी. (छात्र सेना), बालवीर पथक या विषयाची सुविधाही विद्यानिकेतनात उपलब्य आहे.
(४) ग्रंथालय व प्रयोगशाळा – प्रत्येक विद्यानिकेतनासाठी सुसज्ज असे ग्रंथालय असून वाचनालयासाठी मराठी हिंदी, इंग्रजी माध्यमाची दैनिके, साप्ताहिके, मासिके व पुस्तके विकत घेतली जातात. प्रत्येक आठवड्याला ग्रंथालयातून किमान दोन पुस्तके विद्याच्यांना वाचनासाठी दिली जातात. प्रत्येक शाळेची सुसज्ज शालेय प्रयोगशाळा असून विद्याच्यांना प्रयोग करण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत.
६ वी ते १० विसाठी निर्धारित केलेला सर्वसाधारण मा. राज्याचा अभ्यासक्रम या शाळांमधून राबविला जातो. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्नामिक शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी विद्यानिकेतनाच्या विद्याथ्यांची विशेष तयारी करून घेतली जाते.
(५) क्रमिक पुस्तके, स्टेशनरी व वह्या – क्रमिक पुस्तके, शालेय साहित्य, वह्या व इतर आवश्यक साहित्य शाळेतर्फे एकत्रित खरेदी/ शासकीय योजनेतून (समग्र शिक्षा अभियान वर्ग ६ ते ८ फक्त) करून विद्यार्थ्यांना पुरवले जाते. शालेय उपयुक्त वस्तू भांडारामार्फत होणान्या व्यवहारात मुलांचा प्रत्यक्ष सहभाग असतो. प्रत्येक मुलाच्या खात्यावर यासंबंधीचा योग्य त्या नोंदी घेतल्या जातात.*
(६) वसतिगृह य आरोग्यविषयक व्यवस्था – शाळेच्या वसतिगृहात रहाने सर्व विद्यार्थ्यांना अनिवार्य स्वरुपाचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला एक लोखंडी पलंग, एक गादी, चादर, व एक लोखंडी कपाट दिले जाते. वसतिगृहामध्ये विद्यार्थी समूहासाठी कक्ष असून प्रत्येक गृहाची देखरेख करण्याची जबाबदारी एका शिक्षकाकडे (हाऊस मास्टर) सोपविण्यात येते.
वसतिगृहाची व्यवस्था गृहप्रमुखाकडे असते. विद्यार्थ्यांना त्यांच्या योग्यतेनुसार मांसाहारी तसेच शाकाहारी भोजन दिले जाते. भोजनकक्षात भोजनासाठी आवश्यक तें फर्निचर आहे. विद्याध्यर्थ्यांना सकस आहार दिला जातो. सणासुदीला मिष्ठान्नाचे भोजन दिले जाते. मांसाहारी जेवण व अंडी आठवड्यातुन एकदा दिली जातात.
विद्यार्थ्यांचा आरोग्य तपासणीसाठी एक अंशकालीन वैद्यकीय* अधिकारी नेमण्यात आला आहे. किरकोळ आजाराने पीडित विद्याथ्यांसाठी वैद्यकीय सेवा शासकीय व खासगी सेवा उपलब्ध असतात. विद्यार्थ्यांना शाळेकडून मोफत औषधेही दिली जातात.* विद्यार्थ्यांचा आजार जर किरकोळ स्वरूपाचा असेल तर विद्यार्थ्यांची देखभाल विद्यानिकेतनातच केली जाते व पालकांना पूर्व सूचना दिली जाते. जर तो जास्त आजारी झाला तर पालकास त्याबाबतची सूचना दिली जाते व त्यांना बोलविण्यात येते. अशा विद्यार्थ्याला गरजेनुसार घरी नेण्याची जबाबदारी मात्र पालकाची आहे. जरुर पडल्यास मुलांना दवाखान्यातही हलविण्यात येते, आजारी मुलांवर केल्या जाणाऱ्या उपचारावर शाळेचे शिक्षक, वैद्यकीय अधिकारी व कुलप्रमुख देखरेख ठेवतात. दर महिन्याला मुलांची उंची, वजन, यांच्या नोंदी ठेवल्या जातात आणि वर्षातून एकदा विद्याथ्यांची वैद्यकीय तपासणी करून (शासकीय वैद्यकीय रुग्णालय व अमरावती महानगर पालिका आरोग्य विभाग ) त्यांना रोगप्रतिबंधक लस टोचण्यात येते (शासनाच्या वेळोवेळी येणाऱ्या लसीकरण कार्यक्रमा अंतर्गत).
(७) सहशालेय, बहिःशालेय व सृजनशील कार्यक्रम- दैनंदिन अध्यापनाबरोबरच सहशालेय कार्यक्रमांचे महत्त्वही मोठे आहेत. विद्यार्थ्यांचा अंगी असलेल्या सुप्त कलागुणांचा विकास होण्याच्या संधी त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी विद्यानिकेतनात सांस्कृतिक, शैक्षणिक व विविध सहशालेय उपक्रम हाती घेतले जातात. उपक्रमांची वर्गवारी पुढीलप्रमाणे आहे.
(१) शैक्षणिक , (२) सामाजिक, (३) सांस्कृतिक, (४) विषयांवर अध्यापनाचा दर्जा उंचावण्यासाठी उपक्रम (५) संकीर्ण उपक्रम.
काही उल्लेखनिय उपक्रम – सानेगुरुजी कथामाला, हिंदी, संस्कृत, चित्रकला या सारख्या विषयाच्या (चित्रकला ग्रेड) परीक्षा, विविध छंदांना पूरक असे संग्रह, फलक लेखन, वार्ता व सुविचार फलक, विज्ञानवार्ता, मुलाखती, आत्मचरित लेखन, वार्षिक क्रीडा महोत्सव, विद्यार्थी नोंदवही, हस्तलिखिते, दिनविशेष, विज्ञान मंडळ, प्रश्नमंजुषा शुद्धलेखन, अक्षर सुधार प्रकल्प, अवांतर वाचन, चित्रकला, शैक्षशिक साहित्याची निर्मिती, भित्तीपत्रके, सहली, बोलके फलक, व्याख्यानमाला, गीतमंच, निवडणूक, विद्यार्थी संसद, भेट कार्ड इत्यादी उपक्रम विद्यानिकेतनात राबविले जातात.
(8) शरिरिक शिक्षण- विद्यानिकेतनाची दिनचर्या ५:३० वाजता सर्वांगसुंदर व्यायाम किंवा योगासनाने सुरू होते, दररोज सायंकाळी ५ ते ६ या वेळात सामुदायिक खेळ खेळले जातात. बास्केट बॉल, हॉलीबॉल, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, बेसबॉल, टेबलटेनिस, कब्बडी, खो खो, रिंग इ.’ देशी विदेशी खेळांच्या सुविधा उपलब्ध असून तज्ञ क्रीडा शिक्षक विद्याथ्यांना मार्गदर्शन करतात. याशिवाय शारीरिक कवायती, डंबेल्स, मानवी मनोरे, आसने, यांसारखे प्रकारही विद्यार्थ्यांना शिकविले जातात. आंतरशालेय स्पर्धामध्ये विद्यानिकेतनाचे विद्यार्थी भाग घेतात तसेच विविध शासनाच्या क्रीडा विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धात विद्यार्थी सहभाग नोंदवतात.
(9) मनोरंजन- विद्यानिकेतनांत मनोरंजनासाठी रेडियो, दूरदर्शन, संगणक यां- सारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांना नियमितपणे योग्य विषयांचे माहितीपट दाखविले जातात.
कला, संगीत, नाट्य अभिनय यांसारख्या कला अंगी असलेल्या मुलांना विद्यानिकेतना- मधून होणाऱ्या रंजत कार्यक्रमात भाग घेण्यास उत्तेजन दिले जाते.
सहली/स्थानिक भेट- प्रतिवर्षी विद्याथ्यांसाठी प्रेक्षणीय स्थळे, जिल्हादर्शन, महाराष्ट्र दर्शन, अभ्यास दौरे अशा स्वरूपाच्या सहली आयोजित केल्या जातात. सहलीचा खर्च शासनामार्फत* केला जातो.
(* शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या नियमानुसार व उपलब्ध आर्थिक तरतुदी नुसार निर्णय शासन स्तरावर घेतले जातात)
शासकीय विद्यानिकेतन वसतिगृह, अमरावती - आदर्श दिनचर्या
वेळ | क्रिया | |
---|---|---|
१ ) |
सकाळ ५.३० ते ६.४५ वा. |
उठणे, प्रात:विधी, वैयक्तिक स्वच्छता, आंघोळ, प्रार्थना व चहा-दूध |
२) |
सकाळ ६.४५ ते ७.०० वा. |
कवायत, व्यायाम, योगासने, ध्यानधारणा , इ. |
३) |
सकाळ ७.०० ते ८.०० वा. |
दूध / चहा / ब्रेड / बिस्कीट / अल्पोपहार नियोजन नुसार |
४) |
सकाळ ८.०० ते १०.०० वा. |
शालेय पर्यवेक्षीत अभ्यास, खेळ, समुपदेशन, संवाद. |
५) |
सकाळ १० ०० ते १०.३० वा. |
सकाळचे जेवण |
६) |
सकाळ १०.३० ते ११ ०० वा. |
शाळेची तयारी |
७) |
सकाळ ११.०० ते दु. २.३० वा |
शालेय शिक्षण (शालेय तासिका) |
८) |
दुपार २.३० ते ३.०० वा |
अल्पोपहार (दुपार चा नास्ता) |
९) |
दुपार ३.०० ते ४.३० वा |
शालेय शिक्षण (शालेय तासिका) |
१०) |
दुपार ४.३० ते ५.१५ वा |
चित्रकला, संगीत, राष्ट्रपूरूषांबाबत सांस्कृतीक कार्यक्रम |
११) |
सायं ५.१५ ते ६.३० वा |
मैदानी खेळ व वसतीगृह परिसर व वैयक्तीक स्वच्छता |
१२) |
सायं ६.३० ते ७.०० वा |
प्रार्थना, पसायदान |
१३) |
सायं ७.०० ते ७.३० वा |
रात्रीचे जेवण / शतपाऊली |
१४) |
रात्री ७.३० ते ९.३० वा |
शालेय गृहपाठ व अभ्यास |
१५) |
रात्री ९.३० ते १०.०० वा |
बातमीपत्र / मनोरंजन |
१६) |
रात्री १०.०० वा |
झोप |