प्रवेश शुल्क
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे. तर्फे (निवळलेल्या विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा) घेतल्या गेलेल्या शष्यवृत्ती स्पर्धा परिक्षा मेरिट नुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो.
निवडलेल्या आदिवासी संवर्गातील विद्यार्थाना प्रवेश शुल्क शासनाने ठरविल्या प्रमाणे त्यांना पूर्णपणे सवलत आहे
(१२) फी – (अ) शासकीय विद्यानिकेतनांमध्ये ६ वीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांला खालील दराने फी द्यावी लागते :-
अ.क्र.
१
२
३
४
५
प्रस्तावीक दर
५०
५००
२००
४०००
५००
प्रचलित दर
२०
३६०
९६०
२५००
३६०
बाब
प्रवेश शुल्क
शैक्षणिक शुल्क
क्रीडा शुल्क
भोजन शुल्क
वसतिगृह शुल्क
एकूण
४२००
५२५०
दर खालीलप्रमाणे सुधारित करण्याचे मान्य करण्यात आले.
(१३) फी सवलती.- (१) शासकीय विद्यानिकेतनामध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांना त्यांच्या आईवडिलांच्या/पालकांच्या उत्पन्नावर फी माफीच्या सवलती मिळतील, आदिवासी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पूर्णपणे फी सवलत आहे उत्पन्नाच्या मर्यादा व फी सर्वलतीचे सुधारित दर खालीलप्रमाणे मान्य करण्यात आले आहेत :-
पालकांचे वार्षिक उत्पन्न
रु.१५,००० पर्यंत
१५,००१ ते २०,०००/-
२०००१ ते २५०००/-
२५००१ ते ३००००/-
३०००१ चे वर
फी सवलत प्रमाण
१०० टक्के
८० टक्के
६० टक्के
४० टक्के
सवलत नाही
फी माफी प्रमाण
पूर्ण फी माफ
४५७६/-
३४३२/-
२२८८/-
फी माफ नाही
भरावयाची फी
—
११४४/-
२२२८/-
३४३२/-
५७२०/-
उत्पन्नाच्या मर्यादा अथवा सवलतीचे प्रमाणात बदल करण्याचे अधिकार नियामक मंडळ यांना राहतील. ज्या विद्यार्थ्याच्या आईवडिलांचे/पालकांचे ‘वर्षीक उत्पन्न रु. १५,०००/- किंवा त्यापेक्षा अधिक आहे त्यांना शासनाने ठरविल्या प्रमाणे ते फी सवलतीसाठी पात्र समजले जाणार नाही.
(२) प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांना फक्त शैक्षणिक फी माफीची सवलत अनुज्ञेय आहे *. त्यासाठी संबंधित पालकाला तो प्राथमिक शिक्षक असल्याचे प्रमाणपत्र, शिक्षणाधिकाऱ्याला सादर करावे लागेल.
(३) इतर शैक्षणिक संस्थांतून माध्यमिक शिक्षकांना मिळणाऱ्या सवलती शासकीय विद्यानिकेतनामध्ये देण्याचे बंधन शासनावर नाही.
(४) अनुसूचित जाती, जमातींच्या भटक्या, वन्य जमातींच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या उत्पन्नाचे मर्यादेनुसार शुल्क सवलत / शासनाने ठरविल्या प्रमाणे.
(५) आईवडील दोघे अर्थार्जन करीत असतील तर त्या दोघांच्या एकत्रित उत्पन्नाचा विचार फी माफीबाबत अनुज्ञेय होणान्या सवलती देताना केला जाईल.
(६) शासकीय/निम शासकीय नोकरी करणाऱ्यांचे बाबतीत मूळ पगार अधिक महागाई भत्ता अधिक इतर भत्ते म्हणजेच संपूर्ण मासिक वेतन उत्पन्नासाठी विचारात घेतले जाईल.
(७) प्रवेशाच्या वेळीच फी एकदम दिल्यास जादा आकार पडणार नाही.*
(8) फी हप्त्याने भरल्यास रुपये ___जादा द्यावे लागतील.*
(१४) अनामत रक्कम- आपल्या पाल्यासाठी शाळेत प्रवेश घेते वेळी प्रत्येक विद्यार्थ्याच्या आईवडिलांना/पालकांना विद्यानिकेतनाकडे “अनामत” म्हणून रु. ५०० ठेवावे लागतील. शाळेचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याला ही रक्कम परत करण्यात येईल मात्न तसे करताना शाळेची मालमत्ता अथवा साहित्य यांची विद्यार्थ्याकडून मोडतोड अथवा नुकसानी झाल्यास अशा नुकसानीपोटी विद्यार्थ्याकडून वसुली निघत असल्यास तेवढी रक्कम वजा करून उर्वरित रक्कम त्याला परत करण्यात येईल.
(१५) वरकड खर्च- वरकड खर्चासाठी शाळेच्या आवारात विद्यार्थ्याने रोख रक्कम आणता कामा नये. त्याच्या वरकड खर्चासाठी आईवडिलांना/पालकाना शाळेमध्ये ५०० रु अथवा त्यापेक्षा अधिक रक्कम जमा करता येईल. अशा रकमेमधून संबंधित विद्यार्थ्याला हातखर्चासाठी लागतील तेवढे पैसे मिळू शकतील. या व्यवहाराची रोजकिर्द शाळेमार्फत ठेवण्यात येईल. ही रक्कम दुथ. पेस्ट, साबण, तेल, वह्या, इत्यादी व्यक्तिगत गरजांसाठी, बसभाडे या कारणासाठी विद्यार्थ्याला खर्च करता येईल.
(१६) कपडे व. गणवेश-
(१) प्रत्येक मुलाने शाळेच्या नियमानुसार व्यक्तिगत कपडे आणावयाचे आहेत. विद्यार्थ्याने गरजेपेक्षा अधिक कपडे न आणता शाळेने दिलेल्या यादी प्रमाणेच कपडे आणावेत.
( प्रवेश घेतांना आणावयाचे साहित्य
A. बनियान , अंडरपँट प्रत्येकी २/३.
B. टॉवेल, रुमाल, चप्पल, शालेय बॅग, लहान बकेट, मग्गा, टिफिन बॉक्स, चमचा, पाणी बॉटल, शालेय साहित्य, ब्लॅंकेट, कुलूप.
C. नाईट पैजामा, ब्रश, टूथ पेस्ट, साबण, व इतर दैनंदिन साहित्य.)
(२) शाळेतील विद्यार्थ्यांकरिता ठराविक स्वरूपाचा गणवेश निर्धारित करण्यात येईल. (समग्र शिक्षा अभियना अंतर्गत शासनाच्या नियमानुसार वर्ग ६ ते 8 च्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येईल)
(१७) शालेय सत्र व सुट्या- शाळेची दोन सत्रे राहतील, पहिले सत्र जून ते दिवाळी- पर्यंत राहील व दुसरे सत्र दिवाळीनंतर सुरू होऊन एप्रिलच्या मध्यापर्यंत राहील. दीर्घ मुदतीच्या सुट्टया दोनदा दिल्या जातील (उन्हाळी सुट्टी/दिवाळीची सुट्टी).
(१८) शाळेचा दैनंदिन कार्यक्रम नियामक मंडळाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे आधीन राहून स्थानिक परिस्थितीनुसार प्राचार्य ठरवतील.
(१९) शिस्त- विद्यानिकेतनासाठी ठरवून दिलेले शिस्तविषयक नियम कर्मचारी व विद्यार्थी या दोघांवरही बंधनकारक राहतील. विद्याथ्यांचे विद्यानिकेतनामधील त्याचप्रमाणे विद्यानिकेतना बाहेरील सामाजिक जीवनामधील वर्तन त्यांनी विद्यानिकेतनामध्ये जोपासलेल्या जीवनमूल्यानुसार असावे. विद्यानिकेतनाच्या प्रतिष्ठेला तडा जाईल असे वर्तन त्यांच्याकडून होऊ नये. पालकांनीही याबद्दल जागरूक राहून विद्याथ्यांच्या कौटुंबिक व सामाजिक जीवनामधे चारिल्यसंवर्धनास व गुणविकासास पोषक असे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न करावेत.
(२०) प्रवासाची व्यवस्था- सुट्टीमध्ये घरी जाणे आणि सुट्टी संपल्यानंतर शाळेत परत येणे, शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी उपस्थित रहाणे, इत्यादीबाबत आई- वडिलांना स्वतंत्र सूचना देण्यांत येतात. एकदा मुले शाळेत दाखल झाल्यानंतर सुट्टीचे काळात शाळेतून घरी जाणे व घरून शाळेत परत येणे याबाबतच्या मार्गदर्शक सूचना प्राचार्य पालकांना देतात. पालकांनी त्या पाळाव्यात असे अपेक्षित आहे.
आईवडील/पालकांना मार्गदर्शक सूचना
१. पाच वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याशिवाय विद्यार्थ्यां मधुन शिक्षण अर्धवट सोडून विद्यानिकेतनामधून जाता येणार नाही.
२. काही अपरिहार्य कारणास्तव विद्यार्थ्याला विद्यानिकेतनामधून मधेच नाव काढणे अत्यंत आवश्यक झाल्यास शासनाने त्याच्यावर केलेला खर्च, अधिक १० टक्के दंड भरल्यावरच त्याला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र मिळनार (टी सी).
३. विद्यार्थी परीक्षेस बसल्यानंतर शाळा सोडण्यापूर्वी संपूर्ण फी ची व हातखर्चाची थकबाकी तसेच इतर काही येणे असणारी रक्कम भरल्याशिवाय त्याला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र मिळणार नाही.
४. विद्यानिकेतनातील एखाद्या विद्यार्थ्यांची वर्तणूक असभ्य, आक्षेपार्ह अथवा अनैतिक स्वरूपाची आढळल्यास कोणत्याही वेळी अशा विद्याथ्यर्थाचे विद्यानिकेतनामधून नाव काढून त्याला पालकांच्या स्वाधीन केले जाईल.
५. विद्यानिकेतनाच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात ज्या तारखेस होते त्या तारखेस सर्व नियमांची पूर्तता करूनच विद्यार्थ्याला विद्यानिकेतनात प्रवेश घेता येईल.
६. आपल्या पाल्याची प्रगती घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेले सर्व सहकार्य पालकांकडून विद्यानिकेतनाला मिळावे अशी अपेक्षा आहे. व त्यांनी विद्याथी प्रगती साठी कुलप्रमुख, वर्ग शिक्षक, वसतीगृह करीत गृहप्रमुख, व प्रशासकीय कामासाठी कार्यालय लिपिक यांच्याशी संपर्क करावा.
७. विद्यानिकेतनात असताना विद्यार्थ्यांने शाळेच्या गणवेशातच शाळेत अथवा शाळेच्या गणवेशात बाहेर वावरावे अशी अपेक्षा आहे. कोणत्याही सबबीवर विद्यार्थ्याला आपला खाजगी पोषाखात विद्यानिकेतनात असेपर्यंत वावरता येणार नाही.
८. आपल्या पाल्याची फी पालकांनी वेळच्या वेळी भरावी, तसेच हातखर्चसाठी लागणारी रक्कम भरण्यातही दिरंगाई करू नये.
९. विद्यार्थ्यांचा अभ्यास, वर्तणूक, इत्यादी बाबतीत संस्थेकडून होणाऱ्या पत्रव्यवहाराची व संदेशाची/फोनची पालकांनी गंभीरपणे नोंद घेऊन त्यांना योग्य पतिसाद यावा अशी अपेक्षा आहे.
(१०) पालकांनी वर्षातील काही वेळ तरी आपल्या पाल्याची शाळेतील प्रगती व विविध कार्यक्रमांतील त्याचा सहभाग याची प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी राखून ठेवावा यामुळे विद्यानिकेतनामधून प्रतिवर्षी माध्यमिक शालांत परीक्षेला बसणान्या ४० विद्यार्थ्यांपैकी ६० टक्केच्यावर गुण मिळवणाऱ्या पहिल्या २० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल. प्रत्येक विद्यानिकेतनामध्ये या शिष्यवृत्तीचे संच आहेत संबंधित विद्यार्थ्यांना माध्यमिक शालांत परीक्षा निकालानंतर अनुज्ञेयता दाखला दिला जाईल तो ज्या महाविद्यालयात प्रवेश घेईल तेथे प्रवेश घेतल्याचा अहवाल त्याने पाठविल्यानंतर इयत्ता ११ वी व १२ विमध्ये त्याला रुपये १,००० शिष्यवृत्ती मिळेल याशिवाय शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेतल्यास शैक्षणिक शुल्क माफ करण्यात येईल व वसतिगृहातही प्रवेश मिळू शकेल अशा विद्यार्थीला तेथे वसतिगृह शुल्क द्यावे लागणार नाही इयत्ता १२ बीनंतर ही शिष्यवृत्ती १,५०० रुपये दराने दिली जाईल शिष्यवृत्ती सहा वर्षाचा कोणत्याही शाखेचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत चालू राहील त्यासाठी विद्यार्थी प्रतिवर्षी किमान ५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होण् आवश्यक आहे.*
(* शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या नियमानुसार व उपलब्ध आर्थिक तरतुदी नुसार निर्णय शासन स्तरावर घेतले जातात)