प्रवेश अटी:
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर्फे (निवळलेल्या विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा) घेतल्या गेलेल्या शीष्यवृत्ती स्पर्धा परिक्षा मेरिट नुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देन्यात येतो.
(अ) विद्यानिकेतनामध्ये फक्त ग्रामीण भागातील मुलांना प्रवेश दिला जातो. या संदर्भात “ग्रामीण विभाग” याची व्याख्या १० हजार वस्तीपेक्षा कमी लोकवस्ती असलेले खेडे किवा गाव अशी करण्यात आली आहे. अनुसूचित जाती-जमातींच्या व भटक्या आणि वन्य जमातींच्या मुलांना प्रवेशासाठी विशेष सवलती देण्यांत येतात.
(११) ज्या मुलांनी गेल्या दोन वर्षांत ग्रामीण शाळांतून सलग स्वरूपात शिक्षण घेतले आहे व मागील वर्षीच्या परीक्षेत इयत्ता ५ विच्या परिक्षेत शेकडा ६० टक्के अथवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविले आहेत व शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेत मिरीट नुसार अशा मुलांना विद्यानिकेतनामध्ये प्रवेश दिले जातात.*
विद्यानिकेतनामध्ये प्रतिवर्षी फक्त ६ व्या इयत्तेत प्रवेश देण्यात येतात. (प्रत्येक शाळेत २३ बिगर आदिवासी व १७ आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात सहाव्या इयत्तेत प्रवेश मिळविण्यासाठी वयोमर्यादा खालीलप्रमाणे निर्धारित केली आहे. प्रवेश घ्यावयाच्या वर्षाच्या १५ जून या तारखेला १ अनुसूचित जाती/जमाती/भटक्या जमातीचे बाबतीत वय १२ वर्षापेक्षा अधिक असू नये व इतरांचे बाबतीत वय ११ वयापेक्षा अधिक असू नये. आदिवासीच्या बाबतीत बय १३ वर्षांपेक्षा अधिक असू नये. जर वर्षभरात नाव काढून घेतल्यामुळे अथवा शाळेतून घालवून दिल्यामुळे कोणत्याही इयत्तेमध्ये जागा रिकाम्या झाल्या तर त्या तशाच राहू द्यावयाचा आहेत. नियामक मंडळाच्या निर्णयानुसार किंवा शासनाच्या खास आदेशानुसार या जागा भरता येतील.
विहित अटी पूर्ण करणाऱ्या मुलांची निवड शासकीय विद्यानिकेतन प्रवेशाच्या स्पर्धात्मक परीक्षेद्वारा केली जाईल. प्रत्यक्ष प्रवेश मांत्र संबंधित मुले वैद्यकीय तपासणीत पात्र ठरण्यावर अवलंबून राहील.
स्पर्धा परीक्षा- पूर्व-माध्यमिक शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेला बसणाच्या विद्यार्थ्यांची/प्रवेश परीक्षा घेतली जाते. प्रवेश फॉर्मवर विद्यार्थ्याला विद्यानिकेतन मध्ये प्रवेश घायचा आहे, हे नमूद केले पाहिजे. ही परीक्षा शासकीय परीक्षा मंडळ, पुणे यांच्या मार्फत घेतली जाते. प्रवेश अर्ज विद्यार्थी ज्या शाळेत इयत्ता ५ वी शिकत आहे त्या शाळेतून भरावा लागतो.
प्रवेशअर्जाचे फॉर्म जिल्ह्याच्या शिक्षणाधिका-यांकडे (प्राथमिक) मिळू शकतात. आता प्रवेश अर्ज शाळेमार्फत ऑनलाईन भरण्यात येतात. आदिवासी विद्यार्थ्यांची वेगळी स्पर्धा परीक्षा शासकीय परीक्षा मंडळामार्फत घेतली जाते व गुणवत्तेनुसार प्रवेश दिले जातात.